१० वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! परिक्षेसाठी मिळणार 'इतकी' एस्ट्रा वेळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
१० वी-१२वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! परिक्षेसाठी मिळणार 'इतकी' एस्ट्रा वेळ
Published on

दहावी आणि बारावीची परीक्षा करिअरच्या दृष्टीकोनाने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याने पालक आणि इतर समाजघटकांचेही या परीक्षेकडे लक्ष असते. आता ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देताना दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वेळ मिळावा यासाठी परिक्षेसाठी निर्धारित केलेल्या वेळेच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जात होती. परंतु प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होणे, प्रश्न लीक होणे, अशा घटना निदर्शनास येत होत्या. यामुळे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, तसेच परिक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडाव्या यासाठी २०२३ च्या फेब्रुवारी-मार्चपासून ही सुविधा रद्द करण्यात आली.

आता विद्यार्थी आणि पालकांकडून केली गेलेली मागणी आणि त्यांचे हित लक्षात घेऊन २०२४ च्या फेब्रुवारी-मार्च मध्ये होणाऱ्या परीक्षेत वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in