भर पावसाळ्यात पाणी कपातीचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ; उद्यापासून पाणी कपात रद्द

पुण्यातील खडकवासला धरण पुर्ण भरलं असून त्यातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे
भर पावसाळ्यात पाणी कपातीचा त्रास सहन करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ; उद्यापासून पाणी कपात रद्द

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडल्याने नदी नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. तर काही भागात अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मान्सून जवळपास महिनाभर उशिरा दाखल झाल्याने अनेक ठिकाणी पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली होती. अनेक जलाशय आटले होते. काही मुंबई पुणे सारख्या महानगरात यामुळे पाणी संकट कोसळले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुणे शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जला आटत असल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मंबईला पाणीपूरवठा करणाऱ्या सात पैकी चार तलाव तुडूंब भऱल्याने मुंबईचा एप्रिलपर्यंतचा पाणीप्रश्न सुटला आहे. सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तलावांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, मुंबईचा पाणीकपातीचा निर्णय अजूनही मागे घेण्यात आलेला नाही. लवकरच मुंबईच्या पाणी कपातीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अशात पाणी कपातीचं संकट ओढवालेल्या पुणे करांसाठी मात्र, आनंदाची बातमी आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने धरणच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर पुण्यातील खडकवासला धरण पुर्ण भरलं असून त्यातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाणी कपातीचा त्रास सहन करणाऱ्या पुणे करांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्यापासून पुणे शरहातील पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यामुळे आता पुणेकरांना पुर्णवेळ पाणी मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in