Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या अडचणी वाढणार! 'या' प्रकरणी सात दिवसात माफी मागितली नाही तर...

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांच्या अडचणी वाढणार! 'या' प्रकरणी सात दिवसात माफी मागितली नाही तर...

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव(Nitin Yadav) यांनी ॲड.असीम सरोदे(Asim sarode) व अन्य कायदेतज्ञामार्फत बजावली नोटीस

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) व खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करुन नागरिकांच्या भावाना दुखावल्याबद्दल आणि निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव(Nitin Yadav) यांनी ॲड.असीम सरोदे(Asim sarode) व अन्य कायदेतज्ञामार्फत ही नोटीस बजावून सात दिवसात लेखी माफी मागण्याचे आवाहन केलं आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी, "अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आणि सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक" असं वादग्रस्त आणि अवमानकारक विधानं २३ सप्टेंबर रोजी केली होती. यावरुन बारामती आणि पुण्यासह राज्याभरातून संताप व्यक्त करण्यात येत होता. याच अस्वस्थतेला वाट करुन देत ॲड.असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. अनंती जायले यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे.

अजित पवार हे पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. तर सुप्रिया सुळे या सांसदरत्न खासदार आहेत. मताधिक्याने विजयी होणारे लोकप्रतिनिधी आहेत. याउलट पडळकर यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन खोटी माहिती निवडणूक आयोगास दिली आहे. दंडेली पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीचा गुन्हा व अन्य गुन्हे लपवले. एका वाहिनीवर पडळकरांनी गुन्हे कबूलही केले, असं असतात पवार कुटुंबियांबाबत बदनामीकारक, बेताल, अश्लाघ्य वक्तव्य केलं. ते सोशल मीडियात व्हायरल झाल्याने सायबर गुन्हा घडला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. समाजातील वातावरण दुषित व्हावे म्हणून जाणीवपूर्वक हे वक्तव्य केलं असल्याचं या नोटीसमध्ये नमूद केलं आहे.

भाजप खासदार गोपीचंद पडळकर यांनी सात दिवसात पवारसाहेब, अजितदादा व सुप्रियाताई यांची स्वतंत्र पणे लेखी माफी न मागितल्यास त्यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फोजदारी व अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं नितीन यादव यांनी म्हटलं आहे. यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in