मुख्यमंत्र्यांनी चालणारा नट तरी घ्यायचा! जयंत पाटलांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचेही प्रत्युत्तर

मुंबई उत्तर-पश्चिममधून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटाकडून रिंगणात असतील, अशी शक्यता होती.
मुख्यमंत्र्यांनी चालणारा नट तरी घ्यायचा! जयंत पाटलांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचेही प्रत्युत्तर

मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेत अभिनेता गोविंदा अहुजा याचा पक्षप्रवेश सोहळा गुरुवारी पार पडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालणारा नट तरी घ्यायचा,’ असे म्हणत शिवसेनेवर टीका केली. मात्र पाटलांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चोख प्रत्युत्तर दिले.

“गोविंदाचा शेवटचा पिक्चर फ्लॉप ठरला होता. त्याचे पिक्चर सध्या चालत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर नट घ्यायचाच होता, तर मग एखादा चालणारा नट घ्यायला हवा,” असा टोला जयंत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला. त्याला चोख प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले. “गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला नट आहे ना, मग अजून काय पाहिजे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, “कोणीही कलाकारांचा अपमान करू नये. कारण माणसाचे दिवस कधी फिरतात, हे कोणालाही माहिती पडत नाही. एका कलाकाराचा अपमान म्हणजेच संपूर्ण चित्रपटसृष्टीचा अपमान. कलाकारांविरोधात बोलणाऱ्यांना भोगावे लागू शकते.”

मुंबई उत्तर-पश्चिममधून ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटाकडून रिंगणात असतील, अशी शक्यता होती. मात्र त्यांच्या वयाचा विचार करता, त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने गोविंदाला पक्षात घेत, मुंबई उत्तर पश्चिममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in