यंत्रमागधारकांना उभारी देण्यासाठी शासन सकारात्मक -चंद्रकांत पाटील

वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासनस्तरावर एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे.
यंत्रमागधारकांना उभारी देण्यासाठी शासन सकारात्मक -चंद्रकांत पाटील
Published on

लासलगाव : शेतीनंतर देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती यंत्रमाग व्यवसायाच्या माध्यमातून होते. त्याअनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील यंत्रमागधारकांना, वस्त्रोद्योग व्यवसायाला व लघुद्योगाला उभारी देण्यासाठी समितीच्या अहवालाच्या माध्यमातून शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील. असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

मालेगाव येथे शनिवारी विविध यंत्रमाग कारखान्यास भेट व यंत्रमागधारकांच्या विविध समस्यांबाबत बैठक वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, मुंबई वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खांडेकर, नागपूर वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त (तांत्रिक) गणेश वंडकर, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्या., मुंबईचे प्रशासकीय अधिकारी विजय पुजारी, वस्त्रनिर्माण निरीक्षक गजानान पात्रे, लेखाधिकारी ज्ञानेश्वर टिके, तांत्रिक सहाय्यक एस.बी. बर्मा, यंत्रमाग संघटनेचे चेअरमन साजिद अन्सारी यांच्यासह पदाधिकारी, कामगार व नागरिक उपस्थित होते.

वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासनस्तरावर एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२०२८ अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश आहे. यानुसार वस्त्राद्योग धोरणात आवश्‍यक असलेल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्याअनुषंगाने वस्त्रोद्योग विकासाला चालना देण्यासाठी यंत्रमाग व्यवसाय व त्यासंबंधित काम करणा-या कामगारांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यासाठी शासनस्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in