पेण फेस्टिवल 2022 : पेण फेस्टिवलचे शानदार उद्घाटन, छोट्या व्यावसायिकांना तसेच कलाकारांना हक्काचे व्यासपीठ

गेली 14 वर्ष मनोरंजनाचे रेलचेल असलेल्या पेण फेस्टिवलला रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून उत्फुर्त प्रतिसाद
पेण फेस्टिवल 2022 : पेण फेस्टिवलचे शानदार उद्घाटन, छोट्या व्यावसायिकांना तसेच कलाकारांना हक्काचे व्यासपीठ

गेली 14 वर्ष मनोरंजनाचे रेलचेल असलेल्या पेण फेस्टिवलला रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या पेण फेस्टिव्हलला रायगड जिल्हास्तरीय स्वरूप प्राप्त झाले असून पेण फेस्टिवल म्हणजे पेणची शान असल्याचे प्रतिपादन वैकुंठ पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त करत पेण फेस्टिवल उत्तरोत्तर प्रगती करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोपरी ठाणे येथील पूजा भागवत यांनी मिसेस रायगडचा अंतिम विजेता पद पटकाविला.

स्वररंग पेणने आयोजित केलेल्या पेण फेस्टिवल 2022 चा शुभारंभ मोठया उत्साहात करण्यात आला. भाजप पेण विधानसभा संयोजक वैकुंठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेस्टिवलचे उदघाटन करण्यात आले. यावेळी स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, खजिनदार भारती साळवी, शर्मिला पाटील, सारिका पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, कृष्णा वर्तक, शिबूकुमार सिके, सचिन मोदी, मयूर सुर्वे, तन्वी पाटील, महेश भिकावले, संदीप पाटील, श्रेया कुंटे, अनिकेत साळवी, मृगज कुंभार, अनिरुध्द पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

"सर्वांसाठी सर्वकाही" अशी ख्याती असलेल्या स्वररंग पेण फेस्टिवल उद्घाटन मध्ये झालेल्या मिसेस रायगड स्पर्धेत कोपरी ठाणेच्या सौ.पूजा भागवत यांनी मिसेस रायगडचे अंतिम विजेते पद पटकावले. तर नागोठणेच्या सौ.स्मिता कुथे यांनी उपविजेते व अलिबागच्या साक्षी देवरुखकर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जिंकले.

तसेच या स्पर्धेतील बेस्ट कॉस्टयूमच सौ.निधी मोरे (मीरा रोड,मुंबई), बेस्ट स्माईल सौ.सौम्या भगत (अलिबाग), बेस्ट पर्सनॅलिटी सौ.प्रीती पाटील (मीरा रोड, मुंबई), बेस्ट फोटोजनिक सौ.कांचन म्हात्रे (पेण), बेस्ट हेअर सौ.ननीत भोसले (अलिबाग), बेस्ट कॅटवॉक सौ.सुरभी कार्लेकर (रसायनी) या स्पर्धकांनी पारितोषिके पटकाविले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ भिडे तर आभार देवा पेरवी यांनी मानले.

यावेळी युवा नेते वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, पेण फेस्टिवल म्हणजे पेणची शान असून ग्रामीण भागातील जत्रेतून जसा आनंद मिळतो तसा आनंद या पेण फेस्टिवल मधून मिळत असून छोट्या व्यावसायिकांना तसेच कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो. मिसेस रायगड, मिस्टर रायगड, मिस रायगड, रॅम्प ऑक, फॅशन शोच्या माध्यमातून अनेकांचे भवितव्य घडले आहे. 14 वर्ष पेण फेस्टिवलचे यशस्वी आयोजन करून सातत्य राखल्याबद्दल त्यांनी स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी व संपूर्ण स्वररंग टीमचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in