
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निवडणूक आयोगाने मशाल निशाणी दिल्याने पेण तालुक्यातील शिवसैनिकांनी शहरांमध्ये मशाल रॅली काढून जल्लोष साजरा केला. या रॅलीत पेणच्या नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल निशाणी दिली आहे. सदरची निशाणी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता पेण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी रॅलीचे आयोजन केले होते.
उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद, आपली निशाणी मशाल, अरे येऊन येऊन येणार कोण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशिवाय आहेच कोण, 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत पेण शहरातील मुख्य रस्त्यांवरून मशाल रॅली काढण्यात आली. या मशाल रॅलीलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली. यावेळी बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
आगामी निवडणुकांमध्ये बाप चोरणाऱ्यांना व पक्षाची निशाणी गोठवणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय निश्चित आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे कार्य महाराष्ट्राच्या जनमानसाच्या मनामनात आहे. जनता गद्दारांना आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखवेल अशा विश्वास शिवसेनेचे रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन यांनी यावेळी व्यक्त केला.
शिवसैनीकांनी मशाल चिन्ह सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा. शिवसेनेला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी तन-मन-धनाने कामाला लागा. ५० खोके घेणाऱ्या गद्दारांचा नायनाट करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विष्णूभाई पाटील यांनी यावेळी केला.
शिवसेनेचे रायगड जिल्हा सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख दीपश्री पोटफोडे, उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावंड, तालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, शहर प्रमुख संजय पाटील, माजी शहर प्रमुख प्रदीप वर्तक, उपतालुकाप्रमुख भगवान पाटील, संतोष पाटील, जयराज तांडेल, जिते विभाग प्रमुख राजू पाटील, अवजड वाहतूक सेनेचे श्रीतेज कदम, दिलीप पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख अच्युत पाटील, ग्राहक संरक्षणचे नंदू मोकल, नरेश सोनवणे, तुकाराम म्हात्रे, गजानन मोकल, प्रसाद देशमुख, चेतन मोकल, सुधाकर म्हात्रे, विजय पाटील, शिवाजी म्हात्रे, दर्शना जवके महानंदा तांडेल राजश्री घरत प्रेषिता ठाकूर, धनवंती दाभाडे, ज्योत्स्ना शिंदे, अंजली पाटील,अनिता पाटील, रवींद्र मोकल, विशाल दोशी, अरुण भोईर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.