लोहा - कंधार तालुक्याला मिळणार अनुदान; नुकसानीचे पंचनामे सुरू

लोहा - कंधार तालुक्याला जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीच्या अनुदानातून वगळण्यात आले होते
लोहा - कंधार तालुक्याला मिळणार अनुदान; नुकसानीचे पंचनामे सुरू
Published on

नांदेड : लोहा - कंधार तालुक्याला जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीच्या अनुदानातून वगळण्यात आले होते; पण सोयाबीनच्या पिकावर पिवळा मोझॅक हा विषानूजन्य रोग मोठ्या प्रमाणात पडला. तसेच खोडकूज व मूळकुज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे केली होती; त्याच्या प्रयत्नाला यश आले असून, दोन्ही तालुक्यात सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकाने जिल्हाधिकारी यांना दिले, त्यानुसार तहसीलदार यांनी पंचनामे सुरू केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in