Guillain-Barré Syndrome : GBS चा प्रसार रोखण्यासाठी एसओपीची अंमलबजावणी आवश्यक - हसन मुश्रीफ

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी गिलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOPs) च्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली.
हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफसंग्रहित छायाचित्र
Published on

विक्रांत झा / मुंबई

मुंबई : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी गिलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOPs) च्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली. तसेच, या साथीला समन्वित प्रतिसाद देता येण्यासाठी GBS प्रकरणांची दैनंदिन माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मंत्रालयात झालेल्या जीबीएस व्हायरसच्या प्रभाव व नियंत्रण उपायांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी मुश्रीफ यांनी सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या बैठकीस वरिष्ठ अधिकारी राजीव निवतकर (वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त), डॉ. अजय चंदनवाले (वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक) आणि डॉ. रमन घुंग्राळेकर (आयुष संचालक) उपस्थित होते.

व्हायरसविषयी जनजागृती वाढविणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर नागरिकांना शिक्षित करण्याच्या गरजेवर मुश्रीफ यांनी जोर दिला. आरोग्य व्यवस्थेने या साथीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले.

जीबीएसची लक्षणे करून मुश्रीफ यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.मुंबई : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी गिलियन-बार सिंड्रोम (जीबीएस) व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मानक कार्यपद्धती (SOPs) च्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली. तसेच, या साथीला समन्वित प्रतिसाद देता येण्यासाठी GBS प्रकरणांची दैनंदिन माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मंत्रालयात झालेल्या जीबीएस व्हायरसच्या प्रभाव व नियंत्रण उपायांवर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी मुश्रीफ यांनी सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय उपाययोजना करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या बैठकीस वरिष्ठ अधिकारी राजीव निवतकर (वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त), डॉ. अजय चंदनवाले (वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक) आणि डॉ. रमन घुंग्राळेकर (आयुष संचालक) उपस्थित होते.

व्हायरसविषयी जनजागृती वाढविणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर नागरिकांना शिक्षित करण्याच्या गरजेवर मुश्रीफ यांनी जोर दिला. आरोग्य व्यवस्थेने या साथीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची उपलब्धता सुनिश्चित केली पाहिजे, असे मुश्रीफ म्हणाले. जीबीएसची लक्षणे करून मुश्रीफ यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले.

logo
marathi.freepressjournal.in