'आम्ही दगडे मारून सभा उधळणारी लोकं" गुलाबराव पाटलांच्या विधानावर मविआच्या नेत्यांची सडकून टीका

आज जळगावमधील पाचोरा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून सर्व राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे
'आम्ही दगडे मारून सभा उधळणारी लोकं" गुलाबराव पाटलांच्या विधानावर मविआच्या नेत्यांची सडकून टीका

आज जळगावच्या पाचोऱ्यात उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून अनेक महाविकास आघाडीचे नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते आर.ओ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणदेखील करणार आहेत. मात्र, या सभेआधीच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा झाली. "आम्ही दगडे मारून सभा उधळणारी लोकं आहोत. म्हणून आम्हाला चॅलेंज करू नका." असे आव्हान त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना दिले. यावरून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली.

यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "एखादा नेता कोणत्याही ठिकाणी सभा घेऊ शकतो. अशावेळी त्याची सभा उधळून लावणे, दगड फेक करणे योग्य नाही. मुळात दगडफेक करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे प्रकरण मी गृहमंत्री अमित शहांच्या कानावर घालणार आहे. त्यांच्याकडे तक्रार करणार आहेच, शिवाय गृहमंत्री आणि शिंदे- फडणवीस सरकारने याकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्रात गुंडगिरी चालणार नाही. सत्तेतील नेता जर अशी भाषा करत असेल तर मी याचा निषेध करते." अशा कठोर शब्दात त्यांनी यावर टीका केली. तसेच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, "“तुम्ही दगडं मारून सभा उधळणार असला, पण ते शिक्षण ज्या शाळेतील मास्तरांकडे घेतले तेच तिथे सभेला येणार आहेत ना. ती काय दुसरी मंडळी नसून तुमच्याच शाळेतील मुख्यध्यापक आहेत." असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in