पाच लाख रूपयांसाठी विवाहितेचा छळ

फिर्यादीवरुन किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 पाच लाख रूपयांसाठी  विवाहितेचा छळ

नांदेड : दुकान टाकण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये घेवुन ये म्हणून एका महिलेचा सासरच्या मंडळींनी छळ केला. यासंबंधी किनवट येथील २१ वर्षीय महिलेने पोलीसात तक्रार दिली. १ फेब्रुवारी २०२१ ते दि. ८ ऑगस्ट दरम्यान, महिलेच्या सासरी हिंगोली येथील आजम कॉलनीतील सोनु किराणा येथे यातील नमुद पाच आरोपीतांनी संगणमत करून तु दुकान टाकण्यासाठी पाच लाख रूपये तुझे आई व वडीलांकडुन घेवुन ये म्हणुन शिवीगाळ व मारहाण करून तु काळी आहेस, आम्हाला पसंत नाहीस. तु दुबळी आहेस. तुला आम्ही फारकत देता अशी धमकी देत महिलेचा शारिरीक व मानसिक छळ करून घरातुन हाकलुन दिले. याप्रकरणी २१ वर्षीय महिला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in