पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला आग ; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

मृत कुटुंब हे हार्डवेअर दुकानात वास्तव्यास होतं. या घटनेने परिसरात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला आग ; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

आज रक्षाबंधनसारख्या आनंदाच्या दिवशी पुण्यात एक दुखद घटना घडली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील चिखली भागात एक हृदयद्रावक घटना घडली. आज पहाटे येथील एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती दुर्दैवी घटना समोर आली आहे. पहाटे प्रहरी गाढ झोपेत असलेल्या या कुटुंबाला स्वत:चा जीव वाचवण्याची देखील संधी मिळाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झालं. आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचं काम सुरू आहे.

चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय-१०) भावेश चौधरी (वय-१५) असं यादुर्घटनेत मृत पावलेल्यांची नावं आहेत. या सर्वाचा आगीत होरपळून जागेवरचं मृत्यू झाला आहे. माहितीनुसार हे कुटुंब हार्डवेअर दुकानात वास्तव्यास होतं. या घटनेने परिसरात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही आग नेमकी कशी लागली? याची आणखी माहिती अजून समोर आलेली नाही. पण शॉटसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने अथक प्रयत्नाने ही आग नियंत्रणात आणली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in