हसन मुश्रीफ यांना न्यायालयाचा दिलासा

ईडीच्या रडावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातील वजनदार नेते, विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला. कोल्हापूरच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित ४० कोटी रूपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलीसांनी सी समरी अहवाल (क्लोजर रिपोट), दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : ईडीच्या रडावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातील वजनदार नेते, विद्यमान मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा मिळाला. कोल्हापूरच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित ४० कोटी रूपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलीसांनी सी समरी अहवाल (क्लोजर रिपोट), दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची दखल घेत न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांची गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका निकाली काढली.

कोल्हापूरच्या संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित ४० कोटी रूपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याशी संबंधित मुश्रीफ यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज स़त्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळताना अटकेपासून केवळ तिन दिवसाचे संरक्षण दिले. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांच्यावतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने १० मार्च २०२३ रोजी पुढील आदेशापर्यंत ते कायम ठेवले होते. तर ईडीने दाखल केलेल्या गन्ह्यातही हायकोर्टाने अंतरिम संरक्षण दिले होते. ते आजतागायत कायम होते. दरम्यान मुश्रीफ यांनी हा गुन्हा रद्द करा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या समोर सुनावणी झाली, यावेळी सरकारी वकील आशिष सातपूते यांनी यांनी या प्रकरणी पोलीसांनी कागल न्यायालयात सी समरी (क्लोजर रिपोट) अहवाल सादर केला असल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्याची दखल घेत खंडपीठाने मुश्रीफ यांची याचिका निकाली काढली.

logo
marathi.freepressjournal.in