
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना २,१०० रुपये देण्याचा वादा पूर्ण करा, अन्यथा निवडणुकीत मत मिळणार नाही, असे विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. हसन मुश्रीफ यांच्या विधानाने राजकीय वातावरण तापले आहे.
विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि तातडीने अंमलबजावणी केली. लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत ९ महिन्यांचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या ऐन मोसमात महायुतीचे सरकार सत्तेत येताच लाडक्या बहिणींना १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये देऊ असे महायुतीने जाहीर केले.