औरंगाबाद नामांतर याचिकेवर १ ऑगस्टला होणार सुनावणी

एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी आंदोलनेही केली आहेत
औरंगाबाद नामांतर याचिकेवर १ ऑगस्टला होणार सुनावणी

औरंगाबाद शहराचे 'संभाजीनगर' असे नामकरण केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे 'संभाजीनगर' आणि उस्मानाबाद शहराचे 'धाराशिव' असे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने हा प्रस्ताव स्थगित केला होता. मात्र त्यानंतर 16 जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत एमआयएम पक्ष आक्रमक झाला असून औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी आंदोलनेही केली आहेत. आता हा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे.

औरंगाबाद शहराचे 'संभाजीनगर' असे नामकरण करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in