आजपासून राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदारांची अपात्रता सुनावणी

विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रता सुनावणीचा निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विधान परिषद आमदारांची अपात्रता सुनावणी आज अर्थात शुक्रवारपासून सुरू होत आहे.
आजपासून राष्ट्रवादीच्या विधान परिषदेतील आमदारांची अपात्रता सुनावणी

प्रतिनिधी/ मुंबई

विधानसभेच्या आमदारांच्या अपात्रता सुनावणीचा निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विधान परिषद आमदारांची अपात्रता सुनावणी आज अर्थात शुक्रवारपासून सुरू होत आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासमोर विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी दुपारी १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. राष्ट्रवादीचे विधान परिषदेत ९ आमदार असून त्यापैकी ३ आमदार शरद पवार यांच्याकडे, तर ६ आमदार अजित पवार गटाकडे आहेत.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. जयंत पाटील यांनी आमदार सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, अमोल मिटकरी यांच्याविरोधात, जितेंद्र आव्हाड यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. आता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे काय निर्णय देणार, हे पाहावे लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in