जयदीप आपटेच्या अर्जावर ३ डिसेंबरला सुनावणी; मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी सुनावणी ३ डिसेंबर रोजी निश्चित केली.
जयदीप आपटेच्या अर्जावर ३ डिसेंबरला सुनावणी; मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण
Published on

मुंबई : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी  अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी सुनावणी  ३ डिसेंबर रोजी निश्चित केली.

सरकारने जयदीपविरोधात कनिष्ठ न्यायालयात सादर केलेल्या २ हजार पानाच्या आरोपपत्राची प्रत उच्च न्यायालयात सादर केली.

मालवणच्या किल्ला परिसरात उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला. यानंतर शिल्पकार जयदीप आपटेला ४ सप्टेंबर रोजी कल्याणमधून अटक करण्यात आली. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून आपटे याने मुंबई उच्च न्यायालयात ॲड. गणेश सोवनी यांच्यामार्फत अर्ज दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in