नांदेडमध्ये उष्माघाताने तरुणाचा मृत्यू

शहरातील परमेश्वर सूरजवाड हा गुरुवारी हा दिवसभर उन्हात काम करून रात्री घरी परतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असताना त्यांचा मृत्यू झाला.
नांदेडमध्ये उष्माघाताने तरुणाचा मृत्यू
Published on

नांदेड : हिमायतनगर येथे उष्माघाताने परमेश्वर सूरजवाड (३२) या तरुणाचा मृत्यू ओढवला आहे. नांदेड जिल्ह्यातील हा पहिला उष्माघाताचा बळी आहे. मागील १५ दिवसांपासून हिमायतनगर शहर व तालुका परिसरात उष्णतेची लाट सुरू झाली आहे. सकाळी ९ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागल्याने शेतीसह इतर कामकाजात व्यत्यय निर्माण होत आहे. रस्ते निर्मनुष्य होत आहेत.

शहरातील परमेश्वर सूरजवाड हा गुरुवारी हा दिवसभर उन्हात काम करून रात्री घरी परतला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्याने याआधी हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून औषधोपचार घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in