आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा

राज्यातील सोलापूर, बीड, अहमदनगर, लातूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तुरळक पावस इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.
आज मुंबई, ठाणेसह कोकणात उष्णतेची लाट; मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तर, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात पुढील २४ तासात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागानुसार, आज मुंबई, उपनगर, ठाणे आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवसात उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यातील सोलापूर, बीड, अहमदनगर, लातूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तुरळक पावसचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमधील एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पावस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पलिकडे गेले आहे. तर, पुणे, ठाणे, अहमदनगर, रायगड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरला हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in