नागपुरात अतिवृष्टी! दोन तासात ९० मिमी पाऊस ; शहराला पुराचा वेढा

प्रशासनाने तात्काळ पावले उचलत एनडीआरएफ, एसडीआरएफसह लष्करांच्या तुकड्यांना रेसक्यू करण्यासाठी पाचारण केलं.
नागपुरात अतिवृष्टी!  दोन तासात ९० मिमी पाऊस ; शहराला पुराचा वेढा

नागपुरात मध्यरात्री २ वाजेपासून वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या दोन तासात ९० मिमी पाऊस झाल्याने शहराला पुराने वेढा घातला. शहरातील नदीनाले ओव्हरफ्लो होऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यानंतर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत एनडीआरएफ, एसडीआरएफसह लष्करांच्या तुकड्यांना रेसक्यू करण्यासाठी पाचारण केलं. एसडीआरएफ आणि एनडीआरएफकडून सखल भागात देखील १४० नागरिकांना रेस्क्यू केलं.

यावेळी पंचशील चोक केअर हॉस्पिटलच्या मागे वंदना अपार्टमेंट जवळ कार वाहून जात होती. कारमध्ये असलेल्या व्यक्तीला रेस्क्यू करुन बाहेर काढण्यात आलं मुक-बधीर विद्यालयातील ४१ विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. मोरभवन बसस्टॅण्ड परिसरातून १४ लोकांना रेस्क्यू करण्यात आलं. एलएडी कॉलेज हॉस्टेल ५० विद्यार्थीनींना रेस्क्यू करण्यात आलं. वर्मा लेआऊट आणि समता लेआऊटचे २४ तर पंचशील चौकातून ११ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या पावसाने हजारीपहाड भागातील गोठ्यात बांधलेली १२ जनावरे मरण पावली. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इनटकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभिजीत जौधरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. रामगिरी झोपडपट्टी, सिव्हिललाईन्स येथे भिंत पडल्याने ४ घरे पडली. एका ठिकाणी रस्ता वाहून गेला.

नागपूर शहरात मध्यरात्री २ वाजेपासून या अतिवृष्टीसदृश्य पावसाला सुरुवात झाली. दोन तासात ९० मिमी पाऊस बरसला. हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार सकाळी ८.३० पर्यंत ११६.५ मिमी पावसाची नोंद झाली. सध्या हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

एकूण पूर परिस्थीती लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. अभितित चौधरी यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच मनपा मुख्यालयातील अटल बिहारी सिटी ऑपरेशन सेंटरमधूनही त्यांनी शररातील पुर पिरिस्थी जाणून घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in