
राज्यात मुंबई पुण्यासह कोकण पट्ट्यात जोरदार पाऊसाला सुरुवात झाली आहे. तर चंद्रपूरमध्ये देखील जोरदार पाऊस झाल्याने रस्ते जलमय झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी मात्र अजूनही पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. सोमवार पासून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई शहरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम राहणार असून रायगड आणि पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मोसमी पासून सोमवारी जवळपास संपूर्ण राज्यात सक्रिय झाला आहे. सोमवार दे शुक्रवार या काळात रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्याता आला होता. मात्र, हवामान विभागाने मंगळवारी आणि बुधवारी रायगड जिल्ह्याात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
सोमवार रात्रीपासून राजगड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसंच पालघर जिल्ह्यातही बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. आता मात्र हवामान विभागाकडून आता बुधवारी पालघर जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.