शहरवासीयांनी अनुभवली दिल्लीगेट-हिमायत बागेची कहाणी; वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त आयोजित हेरिटेज वॉक

निझामकाळात या बागेची शान काही औरच होती. नहरीच्या पाण्याने ही बाग हिरवीगार असायची.
शहरवासीयांनी अनुभवली दिल्लीगेट-हिमायत बागेची कहाणी; वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त आयोजित हेरिटेज वॉक

छत्रपती संभाजीनगर : वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवानिमित्त आयोजित हेरिटेज वॉक दरम्यान शहरवासीयांनी 'इंटॅक'चे सहसमन्वयक आणि अभ्यासक माहितीदूत ॲड. स्वप्निल जोशी यांच्या शब्दातून पहाटेच्या थंडीत हिमायत बागेच्या निर्मितीची कहाणी अनुभवली. या हेरिटेज वॉकचे आयोजन रविवारी (ता. २८) सकाळी सात वाजता करण्यात आले होते.

यावेळी पर्यटन संचलनलायचे उपसंचालक विजय जाधव, सरस्वती भुवन संस्थेचे कोषाध्यक्ष मिलिंद रानडे, वेरूळ-अजिंठा महोत्सवाचे समन्वयक सारंग टाकळकर, इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी, आदित्य वाघमारे, ज्ञानेश्वर पाटील, सौरभ जामकर, अमित देशपांडे, श्रीनिवास औंधकर, मया वैद्य, अनंत देशपांडे, प्रा. अवसरमल, किशोर पाठक यांच्यासह शहरातील नागरिक आणि इतिहासप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा यांच्या वतीने हे आयोजन केले गेले.

ॲड. स्वप्निल जोशी यांनी सांगितले की, औरंगाबाद शहराच्या उत्तरेकडे असलेला दिल्ली दरवाजा ओलांडला की, डाव्या बाजूला हिमायतबाग आहे. या सरोवराशेजारीच औरंगजेबाने तब्बल तीनशे एकर परिसरात दगड, रेती आणि मातीची भर घालून हिमायतबाग तयार केली. हिमायतबागेत सतराव्या शतकापासूनच्या अनेक दुर्मीळ वनस्पती होत्या; औरंगजेबानंतर निझाम सरकारनेही या बागेची चांगली निगा ठेवली. निझामकाळात या बागेची शान काही औरच होती. नहरीच्या पाण्याने ही बाग हिरवीगार असायची. शहराचे हे एक प्रमुख आकर्षण होते. नहरीच्या पाण्यावर तयार केलेले तत्कालीन कारंजे आजही आपल्याला दिसून येतात; पण बंद पडलेल्या अवस्थेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in