पुणे पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, तत्काळ सुटकेचे पोलिसांना आदेश

पुणे पोर्श अपघातप्रकरणी बालसुधारगृहात असणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला असून त्याला तत्काळ सोडण्याचे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.
Pune Porsche Car Accident
X
Published on

पुणे पोर्श अपघात प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. अपघातप्रकरणी बालसुधारगृहात असणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर झाला असून त्याला तत्काळ सोडण्याचे आदेश हाय कोर्टानं दिले आहेत. अल्पवयीन आरोपीची आई, वडील आणि आजोबा तुरुंगात असल्यामुळं त्याला आत्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याचवेळी अल्पवयीन मुलाची आई, वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार जामीनासाठी त्यांच्या वकिलांकडून प्रयत्न सुरु आहेत.

तत्काळ सुटका करा...

अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतर त्याला बेकायदेशीररित्या बालसुधारगृहात डांबल्याचा आरोप मुलाची आत्या पूजा जैन हिनं केलं होता. पूजा जैननं हिबियस कॉर्पस अंतर्गत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठानं यावर सुनावणी घेत आपला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज न्यायालयानं निर्णय देत अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान मुलाची आई, वडिल आणि आजोबा विविध आरोपांखाली अटकेत असल्याचं सांगत मुलाच्या जीविताला बाहेर धोका होऊ शकतो. त्यामुळं त्याला बालसुधागृहातच राहून द्यावं, असं पोलिसांनी म्हटलं होतं. परंतु न्यायालयानं ही मागणी मान्य केली नाही. अल्पवयीन आरोपीसाठी कोर्टात याचिका दाखल करणाऱ्या पूजा जैन हिच्याकडे मुलाचा ताबा देण्यात यावा, असे आदेश न्यायालयानं दिले.

अल्पवयीन आरोपीच्या जामीनावर काय म्हणाले रविंद्र धंगेकर?

रविंद्र धंगेकर म्हणाले की, "या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाला जामीन झाला. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. सुरुवातीला तपासाला योग्य दिशा न दिल्यामुळं पोलिसांची आणि पुणेकरांची बदनामी झाली. या प्रकरणामुळं पोलिसांनी नियम कडक केलेत. त्यामुळं आमची मुलं आमच्याकडे गाड्या मागत नाहीत, असं अनेक लोक मला सांगतात. आपल्याकडून काही घडल्यास आई वडिलांना त्रास होऊ शकतो, अशी जरब मुलांमध्ये बसली आहे. पुण्यात अशी घटना परत घडू नये."

logo
marathi.freepressjournal.in