महाविकास आघाडीला उच्च न्यायालयाचा धक्का ; देशमुख, मलिक यांची याचिका फेटाळली

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक, एक दिवसाचा जामीन मंजूर करण्याची मागणी देशमुख-मलिक यांनी याचिका दाखल केली होती.
महाविकास आघाडीला उच्च न्यायालयाचा धक्का ; देशमुख, मलिक यांची याचिका फेटाळली

महाविकास आघाडीमधील दोन महत्वाचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी येत्या 20 जून रोजी होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी तात्पुरता जामीन मिळावा अशी याचिका करण्यात आली होती. हि याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सोमवारी उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मलिक यांनी नवीन याचिका दाखल केली होती. मलिक यांनी 20 जूनच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी तुरुंगातून बाहेर येण्यास मुभा मिळावी अशी ती याचिका होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in