आवरे येथे सुरू होणार उच्च महाविद्यालय

या उच्च महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे.
आवरे येथे सुरू होणार उच्च महाविद्यालय

उरण : उरण तालुक्यातील आवरे गावाचे ध्येयवेडे सुपुत्र शिक्षकमित्र तथा प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेमार्फत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मु.आवरे येथे नवीन उच्च माध्यमिक महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे इरादापत्र मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. दि.१५ फेब्रुवारीच्या शासन निर्णयाद्वारे हा प्रस्ताव मंजूर करून संस्थेस शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ आर्ट‌्स, सायन्स अँड कॉमर्स' या नावाने नवीन उच्च महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या उच्च महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे उरण, पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचा शिक्षणासाठी फायदा होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in