शिंदे गटाच्या उमेदवारांच्या संपत्ती सर्वाधिक वाढ; यादीत श्रीकांत शिंदे प्रथमस्थानी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदारांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. शिंदे गटाच्या खासदारांची संपत्तीत ३३९ टक्केने वाढली असून उमेदवाराची सरासरी संपत्ती २४.१ कोटी रुपये आहे.
शिंदे गटाच्या उमेदवारांच्या संपत्ती सर्वाधिक वाढ; यादीत श्रीकांत शिंदे प्रथमस्थानी

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीत पाच वर्षात ६६९ टक्केने वाढ झाली आहे. यापाठोपाठ शिंदे गटाचे मुंबई दक्षिण मध्यचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या देखील संपत्तीत ६१९ टक्केने वाढली आहे. गेल्या पाच वर्षात मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व श्रीमंत विद्यमान खासदारांपैकी श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे या सर्व मतदारसंघात २० मे रोजी निवडणूक होणार आहे. 'इन्फॉर्म वोट्स'ने पाचव्या टप्प्यातील नऊ मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि उमेदवारांच्या संपत्ती, गुन्हेगारी रेकॉर्ड आणि शिक्षण यांच्याबद्दल अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, पीयूष गोयल यांच्याकडे ११०.९६ कोटींची संपत्ती आहे. यामुळे गोयल हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत.

शिवसेनेत श्रीकांत शिंदेंची सर्वाधिक संपत्ती

या अहवालानुसार, शिंदे गटाच्या विद्यमान खासदार आणि उमेदवारांपैकी सर्वाधिक संपत्तीही श्रीकांत शिंदे यांची आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर शिंदेच्या संपत्ती वाढतच गेली आहे. सध्या श्रीकांत शिंदेंच्या संपत्ती १४ कोटी ९३ लाख आहे. तर, शिंदे गटातील राहुल शेवाळे यांच्या देखील संपत्तीत पाच वर्षात वाढ झाली असून शेवाळे हे शिंदे गटातील सर्वाधिक संपत्ती असलेले दुसऱ्या क्रमांकाचे खासदार आहेत. शेवाळेंची संपत्ती १३ कोटी ४३ लाख एवढी असून त्यांची संपत्ती ही ६१९ टक्केने वाढली आहे. यानंतर मुंबई उत्तर पश्चिमचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे देखील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत आहेत. वायकर यांच्याकडे ५४.५१ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदारांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. शिंदे गटाच्या खासदारांची संपत्तीत ३३९ टक्केने वाढली असून उमेदवाराची सरासरी संपत्ती २४.१ कोटी रुपये आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांनी २७५ टक्के सरासरी १४.५ कोटी रुपयांची संपत्ती नोंदवली आहे. यात इतर पक्षांच्या संपत्तीत शिवसेना ठाकरे गटाची संपत्ती ८० टक्के वाढीसह नवव्या स्थानावर आहे. यानंतर भाजप ३१ टक्क्याने वाढीसह दहाव्या क्रमांकावर आहे. तथापि, भाजप उमेदवारांची सरासरी संपत्ती सर्व पक्षांमध्ये सर्वाधिक ४४.६ कोटी रुपये होती.

logo
marathi.freepressjournal.in