Aryan Khan : आर्यन खानच्या निर्दोष सुटकेला हिंदू महासंघाचे आव्हान, प्रकरण उच्च न्यायालयात

हिंदू महासंघाने या प्रकरणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली
Aryan Khan : आर्यन खानच्या निर्दोष सुटकेला हिंदू महासंघाचे आव्हान, प्रकरण उच्च न्यायालयात

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणातून काही दिवसांपूर्वी निर्दोष सुटका करण्यात आली होती. मात्र आता हिंदू महासंघाने या प्रकरणाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड सुबोध पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आर्यन खानला घटनास्थळी रंगेहाथ पकडण्यात आले, त्याने तपास अधिकाऱ्यांसमोर गुन्ह्याची कबुली दिली, या आधारावर न्यायालयाने त्याला दोनदा जामीन नाकारला. मात्र न्यायालयाने आर्यन खान आणि त्याच्या साथीदारांची निर्दोष मुक्तता केली.

या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यासाठी 13 जुलै 2022 रोजी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत मुद्दे मांडण्यात आले होते की तपास यंत्रणा या प्रक्रियेत किती गाफील होत्या, त्यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपींना मदत केली असे दवे आणि अॅड. पाठक यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in