'हिट अँड रन' : पोलिसांवर हल्ला पडला महागात, 33 जणांना कोठडी

सोमवारी नवी मुंबईतील उलवे परिसरातील जेएनपीटी मार्गावर ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांना अटकाव करणाऱ्या पोलिसांवरच काही ट्रक चालकांनी हल्ला करत त्यांना जखमी केले होते.
'हिट अँड रन' : पोलिसांवर हल्ला पडला महागात, 33 जणांना कोठडी

'हिट अँड रन' कायद्याविरोधात सोमवारपासून ट्रक, डंपर चालकांनी संप पुकारला आहे. सोमवारी नवी मुंबईतील उलवे परिसरातील जेएनपीटी मार्गावर ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांना अटकाव करणाऱ्या पोलिसांवरच काही ट्रक चालकांनी हल्ला केला. यात दगडफेक करत काठ्यांनी मारहाण केली. यात चार पोलीस जखमी झाले होते.

अतिरिक्त पोलीस बळ येताच दंगलखोर ५० पेक्षा अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले होते.  चौकशी केल्यावर त्यातील ३३ जणांचा हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर, मंगळवारी या सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यावर न्यायालयाने सर्वांना ५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in