बीडमध्येही हिट अँड रन प्रकरण; पोलीस उपनिरीक्षकाला कारने उडवले

पुणे, वरळीमधील ‘हिट अँड रन’ची घटना ताजी असताना बीडमध्येही रविवारी सकाळी एक ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे.
बीडमध्येही हिट अँड रन प्रकरण; पोलीस उपनिरीक्षकाला कारने उडवले

बीड : पुणे, वरळीमधील ‘हिट अँड रन’ची घटना ताजी असताना बीडमध्येही रविवारी सकाळी एक ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकालाच भरधाव वेगाने येणाऱ्या कारने उडवले असून, यामध्ये या पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

बीडमधील नेकनूरजवळ असलेल्या नन्नवरे वस्तीतून पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र नन्नवरे जात असताना नेकनूरच्या दिशेने जात असलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. कारच्या धडकेने नन्नवरे खाली पडले, तसेच कारही पुढे रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

logo
marathi.freepressjournal.in