हिट अ‍ॅण्ड रन: ट्रक चालकांचे चक्काजाम आंदोलन : मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश; म्हणाले...

राज्यात पेट्रोल, डिझेल एलपीजीचा पुरवठा आणि अन्य पेट्रोलजन्य पदार्थाच्या वितरणात कोणताही अडथळा येऊन ग्राहकांना व सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास व गैरसोय होऊ नये म्हणून तेल कंपन्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन देखील शिंदे यांनी केले.
हिट अ‍ॅण्ड रन: ट्रक चालकांचे चक्काजाम आंदोलन : मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश; म्हणाले...

केंद्र सरकारच्या 'हिट अ‍ॅण्ड रन' कायद्याविरोधात संपूर्ण देशात ड्रक, टँकर चालकांनी चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे. महाराष्ट्रातही याचे मोठ्या प्रमाणावर पडसात उमटले आहेत. कुठेही तणाव निर्माण होणार नाही, तेल कंपन्यांमध्ये रिफायनरीमध्ये एलपीजी वाहतूक करणारे वाहनचालक व वाहतूकदार यांच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्याच बरोबर कायदा आणि सुव्यवस्थेत कुठलीही बाधा येऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ट्रकचालकांबरोबरच टॅक्सी, रिक्षाचालक, खासगी वाहनचालकांना हा कायदा लागू होईल. राज्यात पेट्रोल, डिझेल एलपीजीचा पुरवठा आणि अन्य पेट्रोलजन्य पदार्थाच्या वितरणात कोणताही अडथळा येऊन ग्राहकांना व सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास व गैरसोय होऊ नये म्हणून तेल कंपन्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन देखील शिंदे यांनी केले.

काय आहे कायदा?

नवीन ‘हिट अ‍ॅण्ड रन’ कायद्यांतर्गत दुर्घटनेनंतर चालकाला १० वर्षांची शिक्षा तसेच दंडही भरावा लागेल. टक्कर मारून झाल्यानंतर चालकाने पलायन केल्यास त्याला ‘हिट ॲण्ड रन’ समजले जाते. यापूर्वी या प्रकरणी २ वर्षांची शिक्षा व जामीन मिळत होता. आता १० वर्षांची शिक्षा होईल. या कायद्यातील तरतुदी सौम्य करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली जात आहे. ट्रकचालकांबरोबरच टॅक्सी, रिक्षाचालक, खासगी वाहनचालकांना हा कायदा लागू होईल.

महाराष्ट्रात ट्रकचालकांचे आंदोलन-

या कायद्याविरोधात ट्रकचालकांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन केले. नवी मुंबई, मीरा-भाईंदर, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया येथे ट्रकचालकांनी रास्ता रोको केला. नाशिक जिल्ह्यात एक हजाराहून अधिक वाहने बंद केली. नांदगाव तालुक्यात पानेवाडी येथे तेलाचे डेपो आहेत. या डेपोतून राज्याच्या विविध भागात तेलाचा पुरवठा केला जातो. हे आंदोलन मागे न घेतल्यास नाशिक जिल्ह्यात इंधनाचा पुरवठा बंद होऊ शकतो.

नवी मुंबईत लागले हिंसक वळण-

नवी मुंबईतील ट्रक-ट्रेलर व डंपरचालकांनी मोटार वाहन कायद्यातील सुधारणांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची घटना घडली. आंदोलनकर्त्यांना रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच ४० ते ५० ट्रक-ट्रेलर व डंपरचालकांनी बांबू, लाठ्याकाठ्या व दगडाच्या सहाय्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलिसांची अधिक कुमक मागवून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या तसेच आंदोलन करणाऱ्या ४० लोकांची आतापर्यंत धरपकड करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in