हिंसाचार रोखण्यात गृहमंत्र्याना अपयश; खा. सुळेंचा हल्लाबोल, फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. बीडमध्ये याचे अधिक पडसाद उमटले
हिंसाचार रोखण्यात गृहमंत्र्याना अपयश; खा. सुळेंचा हल्लाबोल, फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी
Published on

मुंबई: मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीडमध्ये थेट आमदारांच्या घरांवर हल्लाबोल करीत जाळपोळही करण्यात आली. सर्वप्रथम माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करीत गाड्या जाळून टाकल्या. यावर आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. हे राज्याच्या गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोप केला. हाच मुद्दा लावून धरीत खा. सुप्रिया सुळे यांनी थेट फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करीत हाच मोठा पुरावा असल्याने फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. त्यामुळे आगामी काळात विरोधक फडणवीसांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. बीडमध्ये याचे अधिक पडसाद उमटले. तसेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची घरे पेटवून दिली. संतप्त आंदोलकांनी हे कृत्य केल्याचा आरोप केला जात असला, तरी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मराठा आंदोलकांपेक्षा आपले विरोधक आणि काळा बाजारवाल्यांनी हे कृत्य घडवून आणले असून, यावेळी पोलिसांनी चक्क बघ्याची भूमिका घेतली, असे सांगतानाच हा हिंसाचार म्हणजे गृहखात्याचे अपयश असल्याचे म्हटले. दरम्यान, खा. सुप्रिया सुळे यांनी हाच गृहखात्यासंबंधीचा सर्वांत मोठा पुरावा असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

राज्य सरकारला पाठिंबा देणारे आमदार स्वत: सांगत आहेत की, त्यांच्या घरावर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. हल्लेखोरांकडे हत्यारे, पेट्रोल बॉम्ब, दगड होते. या संपूर्ण घटनाक्रमात पोलिसांनी केवल बघ्याची भूमिका घेतली, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी थेट गृहमंत्री आणि गृहखात्याचे अपयश अधोरेखित करीत आहेत. त्यामुळे फडणवीसांनी याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. खा. सुळे यांनी या अगोदरही फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in