महाबळेश्वरला मेमध्ये महापर्यटन महोत्सव

लेझर शो, पर्यटकांसाठी सहासी खेळ, निवासासाठी टेंट सिटी, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे.
महाबळेश्वरला मेमध्ये महापर्यटन महोत्सव
एक्स @MahaDGIPR
Published on

मुंबई : लेझर शो, पर्यटकांसाठी सहासी खेळ, निवासासाठी टेंट सिटी, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. २ ते ४ मे दरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच आयोजित पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पावनगड निवासस्थानी दिली.

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५'च्या बोध चिन्हाचे लोकार्पण करण्यात आले. महोत्सवात पर्यटकांसाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वरमधील वेण्णा तलावात महोत्सव कालावधीत नेत्रदीपक लेझर शो होणार आहे. गुजरातमधील कच्छ रणच्या धर्तीवर महाबळेश्वर येथे १००हून अधिक टेन्ट उभारण्यात येणार आहेत. पर्यटकांसाठी निवास व्यवस्थेसाठी टेंट सिटी उभारली जाणार आहे. वेण्णा तलावात पर्यटकांना साहसी खेळ आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल. एक विशेष परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in