होता कंडक्टर म्हणून वाचला ड्रायव्हर!

कंडक्टरने ही बस ताब्यात घेऊन ६० किलोमीटरचा प्रवास केला
होता कंडक्टर म्हणून वाचला ड्रायव्हर!

पेण : एसटीचे कधी छप्पर गळते, तर कधी अॅक्सिलरेटर खराब होतो. रायगडमध्ये घडलेल्या एका प्रकाराने तर एसटी महामंडळाच्या कारभाराचे धिंडवडेच निघाले आहेत. एसटीचालक दारूच्या नशेत असल्याने कंडक्टरने ६० किलोमीटरपर्यंत बस चालवून एसटीची तर अब्रू वाचवलीच, शिवाय प्रवाशांचा जीवही वाचवला. श्रीवर्धन ते मुंबई प्रवासादरम्यान ही धक्कादायक घटना घडली.

श्रीवर्धन ते मुंबई ही बस शुक्रवारी संध्याकाळी साडेचार वाजता श्रीवर्धन स्थानकातून निघाली होती. बस माणगाव एसटी स्टॅन्डला थांबली असता चालकाने तिथेच मद्यपान केले. कंडक्टरच्या ही बाब लक्षात येताच त्याने तातडीने श्रीवर्धन डेपोशी संपर्क साधला. त्यानंतर एसटी कंडक्टरला बस चालवता येत होती. मद्यपी एसटीचालकाला स्टिअरिंगवरून बाजूला करत कंडक्टरने ही बस ताब्यात घेऊन ६० किलोमीटरचा प्रवास केला.

प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा मद्यपी एसटीचालकांविरुद्ध केवळ निलंबनाची कारवाई न करता त्याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

चालक निलंबित

बसचालकाविरुद्ध रामवाडीच्या एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली असून मद्यपी एसटीचालकाला निलंबित केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in