'2024 ला नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईन' ; संतोष बांगर यांची नवी 'गर्जना'

हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
'2024 ला नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान न झाल्यास मी भरचौकात फाशी घेईन' ; संतोष बांगर यांची नवी 'गर्जना'

हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर टीकाही होते. आता पुन्हा त्यांचे एक नवे विधान चर्चेत आहे. 2024 मध्ये मोदी पंतप्रधान नाही झाले तर मी भरचौकात फाशी घेईन, अशी नवी 'गर्जना' बांगर यांनी केली आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. तसे झाले नाही तर मी स्वतः भर चौकात फाशी घेणार, असे संतोष बांगर बुधवारी संध्याकाळी म्हणाले. त्यांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यामध्ये, "जसं मी सकाळी सांगितलं होतं निकाल (आमदार अपात्रता) आमच्याच बाजूने लागेल, तसंच आताही तुम्हाला छातीठोकपणे सांगतो, एप्रिलमध्ये होणाऱ्या आगामी २०२४ लोकसभा निवडणूकीमध्ये देशाचा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार. जर तसे झाले नाही तर हा संतोष बांगर भरचौकात जाऊन फाशी घेईन" असे ते म्हणताना दिसतात.

यापूर्वी कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंजच बांगर यांनी दिले होते. पण, निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली आणि बांगर यांची फजिती झाली होती. याशिवाय, काहीही झाले तरी मी शिंदे गटात जाणार नाही. मी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहीन. मी गद्दार नाहीय असे सांगताना ते मध्यंतरी ढसाढसा रडले होते. त्यानंतर पुढच्या काही दिवसांतच ते शिंदेगटात गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलायला सुरुवात केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in