देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले, तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे - नितीन गडकरी

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार समारंभ नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरमध्ये आयोजित केला होता
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले, तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे - नितीन गडकरी

“देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले, तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे,” असे विधान करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते.

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार समारंभ नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरमध्ये आयोजित केला होता. त्यावेळी गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळेंना येणाऱ्या काळात पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळणार आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, आई-मुलाचा पक्ष नाही. एक ऑटोरिक्षा चालवणारा माणूस आपल्या कामाने-कर्तृत्वाने राज्याचा अध्यक्ष झाला, हे आपल्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. बावनकुळे रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्या कामाने वंचित, पीडितांना त्यांनी नेहमी न्याय दिला. जनतेचं प्रेम मिळवलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास त्यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते.” गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना फडणवीस यांचे अप्रत्यक्षरीत्या उत्तराधिकारी म्हणून घोषित केल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in