धमक्या देऊन कोणाचा आवाज बंद कराल असं वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज - शरद पवार

कायदा आणि सुव्यवस्थेवर मला विश्वास आहे. त्यामुळे मला याची चिंता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
धमक्या देऊन कोणाचा आवाज बंद कराल असं वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज - शरद पवार
@ANI

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना "तुझा लवकरच दाभोळकर होणार" अशी धमकी ट्विटरवरुन देण्यात आली होती. यानंर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणावर शरद पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर मला विश्वास आहे. त्यामुळे मला याची चिंता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे धमक्या देऊन कोणाचा आवाज बंद कराल असं वाटत असेल तर हा गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मला पुर्ण विश्वास आहे, त्यामुळे मला याची चिंता नाही. पण राज्यातील सुत्रे ज्यांच्या हातात आहेत. त्यांना जबाबदारी टाळता येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत मी स्वत: बोललो आहे. तसंच त्यांना तपासाच्या सुचना दिल्या आहेत. असं शिंद म्हणाले आहेत. याच बरोबर शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. तसंच आवश्यकता असल्यास त्यांच्या सुरक्षेत देखील वाढ केली जाईल. असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसंच त्यांच्या पुण्याच्या निवास्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने धमकी मिळाल्यानंतर आक्रमक होत या प्रकरणाची सखोल चौकशीची करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in