

कर्जत : शेगाव देवदर्शनासाठी निघालेल्या कर्जत तालुक्यातील भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील इगतपुरीजवळील बोगद्यात बस दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाली, यात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार, पहाटे सातच्या सुमारास झाला.
कुशीवली गावचा चालक दत्ता ढाकवळ (२६) याचा जागीच मृत्यू झाला, तर सुरेश गौरू लाड (६२) या भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर भाविकांना दुखापती झाल्या असून त्यांच्यावर इगतपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.