आयकेजे केअर फाउंडेशन संस्थेने ‘वूमन अचिव्हर्स अॅवॉर्ड-२०२२’ हा कार्यक्रम राबवला

आयकेजे केअर फाउंडेशन संस्थेने ‘वूमन अचिव्हर्स अॅवॉर्ड-२०२२’ हा कार्यक्रम राबवला

आयकेजे केअर फाउंडेशन ही संस्था सामाजिक जबाबदारी म्हणून अनेक वर्षे काम करत आहे. या संस्थेने ‘वूमन अचिव्हर्स अॅवॉर्ड-२०२२’ हा कार्यक्रम अंबाला शहरात आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला आयटीबीपी ट्रेनिंग सेंटर, पंचकुलाचे पोलीस महानिरीक्षक ईश्वर सिंह दुहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर पोलीस अधीक्षक लखबीर सिंग बराद, योगा फाउंडेशन, हरयाणाचे प्रमुख राजेंद्र वीज उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, पोलीस, खेळ, कला, संस्कृती, महिला सबलीकरण आदी विविध क्षेत्रातील १४० महिलांची निवड करण्यात आली होती.

आयकेजे फाउंडेशनच्या अध्यक्ष राधिका चीमा म्हणाल्या की, समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. बॉलिवूडचे अभिनेते गुलशन ग्रोव्हर हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. आयकेजे फाउंडेशनच्या कार्याचे त्यांनी अभिनंदन केले.

या फाउंडेशनच्या पदाधिकारी उषा जुनेजा, संजीव जुनेजा, सरिता जुनेजा व गुरविंदर चीमा हे कोणत्याही सामाजिक कामासाठी तयार असतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in