कोल्हापूर तावडे हॉटेल ते चिंचवाडा बेकायदा बांधकामाचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात

कोल्हापूर येथील तावडे हॉटेल गांधीनगर ते चिंचवाड बंधारा परिसरातील रस्त्या लगदच्या बेकायदा बांधकामाचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात उपस्थित झाला आहे.
कोल्हापूर तावडे हॉटेल ते चिंचवाडा बेकायदा बांधकामाचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात

मुंबई : कोल्हापूर येथील तावडे हॉटेल गांधीनगर ते चिंचवाड बंधारा परिसरातील रस्त्या लगदच्या बेकायदा बांधकामाचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात उपस्थित झाला आहे. सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर प्रफुल्ल घोरपडे यांच्या वतीने अ‍ॅड. मनोज पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेची मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायामूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने दखल घेत राज्य सरकारकरसह सर्व प्रतिवादी न आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत याचिकेची सुनावणी नोव्हेंबरमध्ये निश्‍चित केली.

या परीसरातील बेकायदा बांधकामांविरोधात प्रफुल्ल घोरपडे यांनी दाखल केलेल्या याचिकेची चार वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाने दखल घेत या बांधकामांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वाच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून याचिका पुन्हा उच्च न्यायालयात वर्ग केली. त्यानुसार घोरपडे यांच्यावतीने अ‍ॅड. मनोज पाटील यांनी याचिका दाखल केली.

logo
marathi.freepressjournal.in