छापेमारीत अवैध मोबाइल नेटवर्क बूस्टर जप्त

महाराष्ट्राच्या विविध भागात झालेल्या छापेमारीत बेकायदेशीररीत्या विकले जाणारे अवैध मोबाइल नेटवर्क बूस्टर जप्त करण्यात आले
छापेमारीत अवैध मोबाइल नेटवर्क बूस्टर जप्त
PM

मुंबई : महाराष्ट्राच्या विविध भागात झालेल्या छापेमारीत बेकायदेशीररीत्या  विकले जाणारे अवैध मोबाइल नेटवर्क बूस्टर जप्त करण्यात आले.  वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनने टेलिकॉम ऑपरेटर्ससह महाराष्ट्राच्या विविध भागात प्रकाश सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली छापे टाकले. वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनने टाकलेल्या छाप्यात अष्टविनायक इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., जीबी रोड, ठाणे (प), येथून तसेच मुंबई जवळील विविध भागात बेकायदेशीरपणे पुरवठा करण्यात येणारे १८० अँटेना आणि ८९ नेटवर्क बूस्टर जप्त करण्यात आले.

बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या मोबाइल नेटवर्कमध्ये गंभीर हस्तक्षेप करणाऱ्या बेकायदेशीर बूस्टर/अँटेनाची उपलब्धता तपासणे हा या छाप्याचा उद्देश होता. वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशनने टेलिकॉम ऑपरेटर्ससह ठाणे, महाराष्ट्राच्या विविध भागात बुधवारी २७ डिसेंबर रोजी प्रकाश सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली छापे टाकले. भारतीय टेलिग्राफ कायदा, १८८५ आणि भारतीय वायरलेस टेलिग्राफी कायदा, १९४३ नुसार अशा वाइडबँड सिग्नल बूस्टरचा वापर बेकायदेशीर आहे.

काय आहे मोबाइल नेटवर्क बूस्टर?

वाइडबँड सिग्नल बूस्टर, अँटेना अशा उपकरणांच्या बेकायदेशीर वापरामुळे सिग्नल समस्या सोडवण्याऐवजी दूरसंचार सेवांचा ऱ्हास होतो. कॉल ड्रॉप आणि कमी डेटा स्पीड यासारख्या नेटवर्क समस्यांसाठी ही उपकरणे मुख्य कारणीभूत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर मोबाइल सिग्नल बूस्टर वापरणे हे मुख्य पुरवठ्यापासून बेकायदेशीर वीज किंवा पाणी पुरवठा कनेक्शन घेण्यासारखे आहे. 

logo
marathi.freepressjournal.in