पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी

शिऊर तालुक्यातील ढोकसांगवी अंतर्गत पाचंगेवस्ती येथील लाइफ केअर ऊग्णालयामध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. दरम्यान, मोबाईल अॅपच्या सहाय्याने विविध ऊग्णांची गर्भलिंग निदान तपासणी केल्याचे उघड झाले.
पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी
पुण्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग चाचणी'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पुणे : शिऊर तालुक्यातील ढोकसांगवी अंतर्गत पाचंगेवस्ती येथील लाइफ केअर ऊग्णालयामध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. दरम्यान, मोबाईल ॲपच्या सहाय्याने विविध ऊग्णांची गर्भलिंग निदान तपासणी केल्याचे उघड झाले.

कारवाईत बीएएमएस शिक्षण घेतलेले डॉ. आकाश मालगुंडे यांच्या रुग्णालयामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. वाघोली पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपाई प्रतीक्षा पानसरे यांनी रुग्णासोबत जाऊन प्रत्यक्ष सापळा रचला. दलाल नरेंद्र ठाकरे याच्यामार्फत मोबाईल ॲपच्या साहाय्याने रुग्णांची गर्भलिंग निदान तपासणी केल्याचे उघड झाले. तपासणीदरम्यान गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान,पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in