Pratapgad: शिवप्रताप दिनी अफजल खान कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!

अफजल खानाच्या (Afzal Khan) कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी काही हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून करण्यात येत होती.
Pratapgad: शिवप्रताप दिनी अफजल खान कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!

सातारा पोलिसांच्या कडक बंदोबस्तात प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात बुधवारी रात्रीपासून दाखल झाले होते. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाला सुरूवात झाली. शिवप्रताप दिनाचा मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात आली.

गेली अनेक वर्षे अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून वाद सुरु होते. अफजल खानाच्या कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावे, अशी मागणी काही हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून करण्यात येत होती. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता. यानंतर २००६मध्ये हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.

अफझल खानाच्या कबरीच्या मूळ ढाच्याला कोणताही धक्का नाही : शंभुराज देसाई

शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हंटले की, " सादर कारवाई करताना अफझल खानाच्या कबरीच्या मूळ ढाच्याला धक्का बसलेला नाही. त्याच्या शेजारी असणारी जागा, भिंतीचं बांधकाम,छत यांना हात लावलेला नाही. दरम्यान परिसरामध्ये असणारे वाढवलेले बांधकाम, वाढवलेली जागा आणि वाढवलेलं काम हे अनधिकृत आहे, असे सर्वोच्च न्यायालयानेच मान्य केलेलं आहे. न्यायालयाने अतिरक्त बांधकाम हटवण्याचे आदेश सरकारला दिले आहेत."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in