"माझ्यात भल्याभल्यांना सरळ करायची ताकद, मी अजून...", शरद पवारांच्या विधानाची सर्वत्र चर्चा

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून शरद पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.
"माझ्यात भल्याभल्यांना सरळ करायची ताकद, मी अजून...", शरद पवारांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
Published on

मी अजून म्हातारा झालो नाही. माझ्यात भल्याभल्यांना सरळ करण्याची ताकद आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमातून शरद पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, "तुमच्याबद्दल माझी एक तक्रार आहे. ती अशी की, तुम्ही तुमच्या सगळ्या भाषणांमध्ये मी ८४ वर्षांचा झालो, मी ८३ वर्षांचा झालो, असा उल्लेख करता. पण तुम्ही माझं काय बघितलंय. अजून मी म्हातारा झालो नाही."

ते पुढे म्हणाले, "माझ्यात लय भारी लोकांनासुद्धा सरळ करण्याची ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका. तुमचं जे काही दुखणं असेल ते सगळं दुखणं दूर करण्यासाठी जे करायला लागले? ते सगळं करु आणि नवीन इतिहास घडवू", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शरद पवार यांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

logo
marathi.freepressjournal.in