खासदार सुनिल तटकरे यांचं तात्काळ निलंबन करा ; सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

राज्यात एकीकडे आमदार अपात्रता प्रकरणाचा विषय विधानसभा अध्यक्षासमोर सुरु असताना खासदार अपात्रतेप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांचं पत्र चर्चेत आलं आहे.
खासदार सुनिल तटकरे यांचं तात्काळ निलंबन करा ; सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

राज्यात एकीकडे आमदार अपात्रता प्रकरणाचा विषय विधानसभा अध्यक्षासमोर सुरु असताना खासदार अपात्रतेप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांचं पत्र चर्चेत आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिलं आहे.

अजित पवार यांच्या गटासोबत गेलेल्या खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलै रोजी याचिका दाखल केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याची सुप्रिया सुळे यांनी विनंती केली आहे. घटना आणि लोकशाही तत्वे टिकवून ठेवण्यासाठी वेळीच निकाल दिला पाहिजे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

फैजल खान यांना कोणतीही केस नसताना आम्हाला कोर्टाची लढाई लढावी लागली. त्यामुळे परिशिष्ट १० नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई करा, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

हे खासदार महिला विधेयकाच्या वेळी उपस्थित नव्हते. आम्ही पक्षासाठी न्याय मागत आहोत. अशा लोकांना गांभीर्याने घेतलं पाहीजे. लोकसभा सोडून जर लोकप्रतिनीधी नसतील नसतील तर ही चिंतेची बाब असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीत अदृश्य शक्ती आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याचा उल्लेख केला आहे. हे सर्व दुसऱ्याच्या जीवावर चाललं आहरे. फक्त राष्ट्रीय पक्ष नाहीत तर महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यात येत आहेत. रोजगारात देखील राज्याचे खच्चीकरण करण्यात येत आहे. खासदारांचं प्रकरण देखील न्यायालयात देण्याची वेळ आल्याची शक्यता आहे. न्यायालय देखील अध्यक्षांवर नाराज आहे. देश संविधानावर चालतो. अदृश्य शक्तीवर चालत नाही. आमचं राजकारण संविधानाने चालतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in