श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

मानाच्या पाच गणपतीलाही ट्रस्टकडून पुष्पहार अपर्ण करण्यात आला.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन

आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ त्यावर उभारलेला पुष्प रणशिंग चौघडा, रथावर होणारी कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी आणि सोबतीला मर्दानी खेळांसह ढोल-ताशाचा दणदणाट अशा दिमाखदार आणि तब्बल १० तास चाललेल्या नेत्रदीपक मिरवणुकीने देशातील मानाचा पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी विसर्जन झाले.

परंपरेनुसार शुक्रवारी सकाळी मंडईतील महात्मा फुले पुतळ्याला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पुष्पहार घालून या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाच्या पाच गणपतीलाही ट्रस्टकडून पुष्पहार अपर्ण करण्यात आला. उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्या हस्ते गणपतीची आरती झाल्यानंतर रात्री ११ वाजता प्रत्यक्ष मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या सुरुवातीला भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा विराजमान असलेला रथ लक्ष वेधून घेत होता त्यापाठोपाठ शिवयोद्धा मर्दानी आखाडा यांच्या बालकलाकारांकडून लाठीकाठी, तलवारबाजी, भाला अशा विविध साहसी खेळांची प्रात्यक्षिके साजरी केली जात होती. त्यापाठोपाठ समर्थ, नादब्रम्ह आणि श्रीराम या ढोलताशा पथकाचे वादन होते. लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणूक आल्यानंतर विविध ठिकाणी परंपरेनुसार भाऊसाहेब रंगारीला पुष्पहार अपर्ण करून संबंधित मानाच्या व्यक्तींच्या हस्ते आरती केली जात होती. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांकडून पुष्पवृष्टीही केली जात होती. त्यात रथावर होणारी विद्युतरोषणाई यामुळे हा रथ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in