`एसटी कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक पॅटर्न राबवा`

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली ११०० कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी एफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही.
`एसटी कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक पॅटर्न राबवा`
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली ११०० कोटी रुपयांची रक्कम एसटीने पी एफ ट्रस्टमध्ये भरलेली नाही. पीएफ मध्ये जमा असलेल्या रक्कमेतून ऍडव्हांस मागणी करणारे २५०० कर्मचारी ऑक्टोंबर पासून पीएफ ऍडव्हांस रक्कमेच्या प्रतीक्षेत असून मुला- मुलींची लग्ने, आजारपण व शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने त्रस्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांना पी.एफ. अँडव्हान्स रक्कम मिळण्यासाठी एसटीत कर्नाटक पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८९ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे ११०० कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे १००० कोटी रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे २१०० कोटी रुपयांची रक्कम गेले दहा महिने एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही.

काय आहे कर्नाटक पॅटर्न?

महाराष्ट्र एसटीप्रमाणेच कर्नाटक एसटीसुद्धा आर्थिक अडचणीत सापडली असली तरी तिथे कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू आहे. कर्नाटक एसटीला खर्चाला निधी अपुरा पडल्यास तिथे कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी कर्ज घेतले जाते. त्यांच्याकडेही मध्यंतरी पी. एफ. अँडव्हान्स रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता. परंतु तिथल्या राज्य सरकारने कर्नाटक एसटीला कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्वतः मध्यस्थी केली. तसेच कर्जाची हमी घेऊन २००० कोटी रुपये इतकी रक्कम कर्ज म्हणून मिळवून दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांची पी. एफ. अँडव्हान्स रक्कम मिळाली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्ज उपलब्ध करून देण्यात आले तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्याना दिलासा मिळेल, अशी मागणी बरगे यांनी म्हंटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in