महिलांना पिंक रिक्षा; कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक रेल्वे मार्गाचे भूसंपादन; बघा अंतरिम अर्थसंकल्पातील 10 महत्त्वाच्या घोषणा

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. लोकसभा निवडणुका असल्यामुळे हा चार महिन्यांसाठीचाच अंतरिम अर्थसंकल्प अर्थातच लेखानुदान आहे.

बघूया यातील काही महत्त्वाच्या घोषणा

-सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत

-विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गाकरिता भूसंपादनासाठी २२ हजार २२५ कोटी

-कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गाचे भूसंपादन सुरू

-विदर्भ सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटींची तरतूद करणार

-१० मोठ्या शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार

-नागपूरच्या धर्तीवर पुण्यात औंध येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात ‘एम्स’ची स्थापना करण्याचे नियोजन

-सर्व जिल्ह्यात १५ खाटांचे अद्ययावत ‘डे केअर केमोथेरपी केंद्र’ स्थापन करणार

-डायलिसिस केंद्र नसलेल्या २३४ तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्र कार्यान्वित करणार

-प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करून देणार

-बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आर्टी स्थापन करणार

-गोवा, दिल्लीप्रमाणे बेळगाव येथे मराठी भाषा उपकेंद्राची स्थापना होणार

-मंगेश पाडगावकर कवितेचे गाव हा उपक्रम वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) येथे राबविणार

logo
marathi.freepressjournal.in