मुंबई-पुणे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी - मुंबई-पुणे दरम्यानच्या 'या' ट्रेन रद्द

आज १९ जुलै आणि उद्या २० जुलै रोजी या ट्रेन बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे
मुंबई-पुणे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी - मुंबई-पुणे दरम्यानच्या 'या' ट्रेन रद्द

सध्या मुंबईसह उपनगरात धुवाधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हवामान खात्याकडून देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ ते बदलापूर आणि पनवेल ते बेलापूर दरम्यानच्या लोकल बंद करण्यात आल्या आहेत. ऐन वर्दळीच्या वेळी ट्रेन बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. अशात आता मुंबई-पुणे आणि पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे गाड्यांबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.

राज्यातील मुंबई,पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मुंबई विभागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणई साचल्यानं मुंबईृ-पुणे आणि पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. आज १९ जुलै आणि उद्या २० जुलै रोजी या ट्रेन बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

यात डेक्कन क्विन, इंद्रायणी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस आणि इंटरसिटी या पुणे-मुंबई धावणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. मुंबई-पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या ट्रेन महत्वाच्या आहेत. मात्र, मुंबईतील झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या ट्रेन रद्द करण्यात आल्याचं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in