छत्रपती संभाजीनगरमध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट; कल्पतरू महाविद्यालय येथे १५ जणांवर तत्काळ कारवाई

र्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांनीच यंदा उधळून लावले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचा सुळसुळाट; कल्पतरू महाविद्यालय येथे १५ जणांवर तत्काळ कारवाई
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

छत्रपती संभाजीनगर : बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियान विद्यार्थ्यांनीच यंदा उधळून लावले आहे. गुरुवारी बारावी परीक्षेत विविध केंद्रावर अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असता गाईड, स्पार्क गाईड मायक्रो झेरॉक्स सापडले.

वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा जीवशास्त्राचा पेपर सुरू असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांच्या भरारी पथकाने भेट दिली. यावेळी केंद्रावर मोठ्या प्रमाणात परीक्षा उपयोगी साहित्य, गाईड, स्पार्क गाईड, मायक्रो झेरॉक्स, इतर साहित्य परीक्षा इमारतीच्या बाजूस व एका विद्यार्थ्याकडे आढळून आल्याने पथकाने संस्था अध्यक्ष व सचिव तसेच केंद्र संचालक व १५ पर्यवेक्षक यांच्यासह संबंधित विद्यार्थ्यांवर कॉपी गैरमार्गप्रकरणी कारवाई केली आहे. फुलंब्री येथील पिंपळगाव वळण येथील प्रकरण ताजे असतानाच शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने वैजापूर येथील कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालय निमगाव येथे अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान पथकास इमारतीच्या आजूबाजूला परीक्षा दालनाबाहेर कॉपी तसेच परीक्षा उपयोगी साहित्य, गाईड मायक्रो झेरॉक्स इत्यादी गैरप्रकारातील साहित्य आढळून आले. पथकाने केंद्रात प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनाबाहेर कॉप्यांचा वर्षाव केला.

logo
marathi.freepressjournal.in