पुण्यात नववीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला

वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून नववीतील एका विद्यार्थ्याने वर्गातच त्याच्या दुसऱ्या मित्राचा काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मांजरीमधील एका खासगी शाळेत झालेल्या या घटनेप्रकरणी १४ वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात पुण्यात नववीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला.
पुण्यात नववीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला
Published on

पुणे : वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून नववीतील एका विद्यार्थ्याने वर्गातच त्याच्या दुसऱ्या मित्राचा काचेच्या तुकड्याने गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मांजरीमधील एका खासगी शाळेत झालेल्या या घटनेप्रकरणी १४ वर्षीय मुलाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात पुण्यात नववीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा चिरला.

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेल्या १५ वर्षीय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून वाद झाला होता. मंगळवारी दुपारी अडीच वाजता तक्रारदार मुलगा वर्गात बसलेला असताना, आरोपी मुलाने पाठीमागून त्याच्या गळ्यावर धारदार काचेच्या तुकड्याने वार केले. मुलाच्या या कृत्यामुळे वर्गातील अन्य विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. त्याचवेळी आरोपीने जखमी मुलाला ‘मी तुझी विकेट पाडीन’, अशी धमकी दिली. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

logo
marathi.freepressjournal.in